तीन उद्दीष्टे डोळ्यासमोर ठेऊन प्लेटॉर चाइल्डस्पेसेसचे व्हिजन निश्चित करण्यात आले आहे:
आमचे मिशन :
मुलांच्या गरजा पूर्ण करतानाच त्यांच्यासाठी आधुनिक सोईसुविधा देणारे पोषक वातावरणही हवे. मुले मोठी होताना भवतालच्या परिसराशी आणि निसर्गाशी त्यांचे नाते निर्माण व्हावे, अशी आमची ईच्छा आहे. आमच्या प्रोजेक्टमध्ये सिटिंग एरिआ, अलकोव्हज् आणि गझेबो आहेत. त्यामागेही कारण आहे. मुले एकलकोंडी न होता त्यांनी इतरांशी मिळून मिसळून वागावं, त्यातून परस्पर सहकार्याची आणि एकोप्याची भावना वाढीला लागावी, असे आम्हाला वाटते.
आमच्या ग्रीन झोनमध्ये विविध प्राण्यांच्या प्रतिकृती असलेल्या उत्तम बागा आहेत. छोटेखानी प्राणी संग्रहालय आणि ट्री हाऊस आहेत. वाढदिवसाची पार्टी आणि विविध सण-समारंभ इथे साजरे होतील. कधी मुले कँपसाठी जमतील, कधी आकाश निरीक्षणात रमतील, तर कधी मस्त शेकोटी पेटवून धमाल करतील.
क्लब हाऊसमध्ये इनडोअर गेमिंग झोन आहे. तिथेच आर्केड गेम्स आणि मुलांसाठी लायब्ररी आहे. शिक्षण हाच मुलांच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे यावर आमचा विश्वास आहे. जागतिक दर्जाच्या शिक्षण संस्थेत प्लेटॉरमधील मुले चालत चालत किंवा सायकलवरुन जाऊ शकतील. इथे अॅक्सेस पॉइंट्स, आणि ड्रॉप ऑफ एरिया आहेत. मुलांना एकत्र जमण्यासाठी आणि वाहनाची वाट पाहण्यासाठी निश्चित जागा आहेत. मुलांसाठी आणि मोठ्यांसाठीही रस्त्यावर सेफ्टी झोन आहेत.