आमचे पार्टनर्स

Generic placeholder image

ब्रिग ईगल

परवडणारी घरे उपलब्ध करुन देण्यासाठी बांधील असलेली ब्रिग ईगल ही कंपनी संपूर्ण भारतात हजारो घरं उपलब्ध करुन देणार आहे.

या क्षेत्रात नव्याने येणाऱ्या अनेक उद्योजकांशी ‘ब्रिक ईगल’ने संपर्क साधला असून नव्या कंपन्या तयार करुन त्यांच्यावर विविध कामांची जबाबदारी सोपवली आहे. गृहखरेदी प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्याकडे त्यांचे बारकाईने लक्ष असल्यामुळेच लक्षावधी भारतीयांना परवडण्याजोगी आणि पर्यावरणपूरक घरे उपलब्ध होत आहेत.

एक्सर्बिया, शेल्ट्रेक्स आणि प्लेटॉर हे जमीन विकसित करुन त्यावर उत्तम दर्जाचे आणि परवडण्याजोगे गृहप्रकल्प उभे करत आहेत. टेक्निक प्रोजेक्ट कन्सल्टंट या बांधकाम क्षेत्रातील कंपनीकडे या प्रकल्पाचे व्यवस्थापन आहे. ‘क्लिकब्रिक’कडे विक्रीची जबाबदारी आहे. तर ही सगळी माहिती माध्यमांद्वारे लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम झेको एडव्हरर्टायझिंगकडे आहे. (किंवा या प्रकल्पाच्या ब्रँडिंगचे काम झेको एडव्हरर्टायझिंगकडे आहे.)

अंतर्गत सजावटीचे कामदेखील ‘ब्रिक ईगल’कडेच असून रेंडरलॉजी नावाचे त्यांचे ऑनलाइन मोड्युलर फर्निचर पोर्टर आहे. ब्रिक ईगल मुख्यत्वे मुंबई मेट्रो रिजनमध्ये कार्यरत आहे. पुणे, म्हैसूर, बंगळुरू आणि चेन्नईमध्येही कंपनीचे प्रकल्प आहेत. अधिक माहितीसाठी, पुढील संकेतस्थळाला भेट द्या. www.brickeagle.com

Generic placeholder image

संगम रिअल्टी

‘प्लेटॉर चाइल्डस्पेसेस’शी संलग्न असलेली कंपनी म्हणजे संगम ग्रुप. बांधकाम व्यवसायात हा ग्रुप एक दशकाहून अधिक काळ कार्यरत असून देशभरात त्यांनी अनेक मोठे प्रकल्प पूर्ण केले आहेत.

चेअरमन संतोष भन्साळी यांनीच ही कंपनी स्थापन केली असून या कंपनीची धुरा मुलगा सुजित भन्साळी यांच्याकडे आहेत.

बंगळुरू, चेन्नई, कोलकता या शहरांमध्ये अनेक प्रकल्प साकार करत ‘संगम ग्रुप’ने पॅन इंडिया कंपनी असा लौकीक मिळवला आहे. उत्तम दर्जाचे बांधकाम आणि त्यासाठी लावलेले गुणवत्तेचे निकष ही या ग्रुपची ख्याती आहे. फ्रेमवर्क टेक्नोलॉजीचा वापर हे त्याचेच एक उदाहरण. या तंत्रज्ञानात विशिष्ट आकाराच्या साच्यामध्ये काँक्रीट ओतले जाते. संपूर्ण जगभरात सध्या फ्रेमवर्क टेक्नोलॉजीचा वापर होतो. त्यामुळे प्रकल्प जलद गतीने, कमी खर्चात उभारता येतात. शिवाय पर्यावरणासाठीही हे तंत्रज्ञान हितकारक आहे.

जागतिक दर्जाच्या अशा निकषांच्या आधारे संगम ग्रुपने देशभरात 1.9 दशलक्ष स्क्वेअर फूटाचे बांधकाम केले आहे. गृहनिर्माण म्हणजे ग्राहकांबरोबर जन्मभराचे नाते निर्माण करणे यावर संगम ग्रुपचा विश्वास आहे. या विश्वासातूनच संगम ग्रुपच्या सगळ्याच प्रकल्पात विविध सोशल अॅमेनिटीजचा विचार करण्यात आला आहे. इथे राहणे म्हणजे आयुष्य ताजेतवाने आणि समृद्ध करणारा अनुभव तर आहेच..शिवाय आपण रहात असलेल्या समाजावरही त्याचा सकारात्मक परिणाम होतो. त्याद्वारेच लोकल लँडस्केपवर ग्लोबल लाइफस्टाईल उपलब्ध करुन देण्यासाठी संगम प्रयत्नशील आहे. (किंवा त्याद्वारेच स्थानिक जमिनींवर जागतिक सोईसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी संगम प्रयत्नशील आहे.)

उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम नियोजित वेळेत पूर्ण करुन, किफायतशीर किमतीत घरे उपलब्ध करुन देणे हीच संगमची उद्दिष्टे आहेत. बांधकाम क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञान, कॉम्प्युटरच्या आधारे तयार केलेले डिझाइन्स, उपलब्ध साधनसामुग्रीचा नेमका वापर आणि आपल्या देशात विकसित झालेल्या इंडस्ट्रीयल इंजिनियरिंग प्रोसेसची अंमलबजावणी यांचा मेळ साधत ही उद्दीष्टे साध्य केली जात आहेत.

आधुनिक विचार स्विकारताना आणि नव्या तंत्रज्ञानाची कास धरताना संगम ग्रुपने कायम कौटुंबिक मुल्ये जपली आहेत. संगम ग्रुपच्या यशाचे तेच गमक आहे.

Generic placeholder image

वास्तुविशारद हफीज कॉन्ट्रॅक्टर

प्लेटॉरच्या सर्वच उपक्रमांना वास्तुविशारद हफीज कॉन्ट्रॅक्टर यांचे सहाय्य लाभले आहे. मास्टर प्लॅन तयार करण्यापासून प्लेटॉर टाऊनशीपमधील मनाला भिडेल अशा आधुनिक वास्तुरचना तयार करण्यात त्यांचे योगदान आहे.

हफीज कॉन्ट्रॅक्टर यांची फर्म देशविदेशातील 70 हून अधिक पुरस्कारांची मानकरी ठरली आहे. जगभरातील अनेक प्रकल्पांची संकल्पना आणि आराखडे तयार करुन त्यांनी ते प्रकल्प साकार केले आहेत.

हफीज कॉन्ट्रॅक्टर हे बाँम्बे हेरिटेज कमिटी आणि न्यू दिल्ली ल्युटन्स बंगलो झोन रिव्ह्यू कमिटीचे सदस्य आहेत. महाराष्ट्र, राजस्थान, बिहार, छत्तीसगड, कर्नाटक आणि मध्य प्रदेशसह विविध राज्यांच्या हाऊसिंग बोर्डाच्या पॅनेलवर आहेत

अनेक आलिशान गृहप्रकल्पांसाठी त्यांची ख्याती आहेच. मात्र विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकास योजनेतील त्यांचे योगदान. 1990 च्या दशकात ही योजना मुंबईत राबवण्यात आली. सरकारी-खासगी भागिदारीची एक क्रांतीकारी संकल्पना हफीझ कॉन्ट्रॅक्टर यांनी अधिकाऱ्यांना सादर केली. त्यामुळे एफएसआय वाढवून मिळण्याच्या मोबदल्यात बांधकाम व्यावसायिकांन झोपडपट्टीवासीयांना पक्की घरे देऊ शकले.

वास्तुरचनेसंदर्भात नावीन्यपूर्ण दृष्टीकोन असल्यामुळेच प्लेटॉरच्या उपक्रमात त्यांचा सहभाग हा ओघानेच आला. अधिक माहितीसाठी भेट द्या www.hafeezcontractor.com

Generic placeholder image

अशोका

ग्राहकांना परवडणारी घरे उपलब्ध करुन देण्याच्या प्लेटॉरच्या उपक्रमात सहभागी झाल्याचा अशोकाला अभिमान आहे. सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या या क्षेत्रात विविध उद्योजकांच्या पाठीशी अशोका 30 वर्षांहून अधिक काळ खंबीरपणे उभी आहे. भारत शाश्वत विकासाच्या मार्गावर जात असताना बेघर असण्याच्या समस्येकडे दूर्लक्ष करता येणार नाही. म्हणूनच प्लेटॉरच्या या उपक्रमात सहभागी होऊन हजारो भारतीयांचे आयुष्य बदलून टाकायला अशोका उत्सुक आहे.

जुन्या घरांची सुधारणा आणि किफायतशीर किमतीत नवी घरे बांधून देतानाच सर्वांसाठी घर (Housing For All) यासाठी ‘अशोका’ने पुढाकार घेतला आहे. प्लेटॉर उपक्रमही याच प्रयत्नांचा एक भाग आहे.

गृहबांधणी क्षेत्रात मागणी आणि ग्राहकांचा प्राधान्यक्रम जाणून घेण्यासाठी एच एफ ए इंडियाने ग्राहकांचा सखोल अभ्यास केला आहे. परवडण्याजोग्या गृहप्रकल्पांना अधिक चालना देण्यासाठी त्याचा उपयोग होत आहे. प्लेटॉरमधील फ्लॅट्स विकत घेणाऱ्या संभाव्य ग्राहकांची एक मोठी यादीच त्यातून तयार झाली आहे. ही केवळ माहिती किंवा आकडेवारी नाही, तर असंख्य भारतीयांसमवेत एक प्रकारचे नातेच त्याद्वारे निर्माण झाले असून त्यांचे आयुष्य समृद्ध करण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे.

सामाजिक स्वास्थ्यासाठी आणि प्रगतीसाठी स्वच्छ आणि आरामदायी घर अत्यावश्यक आहे, यावर अशोकाचा विश्वास आहे. म्हणूनच प्लेटॉरसाठी सर्व प्रकारचे सहकार्य अशोका आनंदाने देणार आहे.

अधिक माहितीसाठी भेट द्या india.ashoka.org.

Generic placeholder image

क्लिकब्रिक

विक्री प्रक्रियेत आऊटसोर्सिंगमध्ये क्लिकब्रिकने रिअल इस्टेट क्षेत्रावर भर दिला आहे. त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये 1 हजार कोटी रुपयांच्या गृहप्रकल्पांची माहिती आहे. सुमारे 2000 हून अधिक चॅनल पार्टनर्सचे भक्कम जाळे हे ‘क्लिकब्रिक’चे बलस्थान आहे. त्यामुळेच रिअल इस्टेट डेव्हलपर्सना विक्री प्रक्रियेचे स्वरुप निश्चित करुन त्यावर लक्ष ठेवता येते. गृहप्रकल्प सुरू करण्यापासून ते ताबा देईपर्यंत विविध टप्प्यांवर क्लिकब्रिकची मदत होते. संभाव्य ग्राहकांची माहिती मिळवणे, घरांची नोंदणी, रजिस्ट्रेशन, पेमेंट्स आणि विक्रीपश्चात सेवा याचा त्यात समावेश आहे.

Generic placeholder image

झेको

मुंबईत मुख्यालय असलेली झेको ही कंपनी प्रामुख्याने मार्केटिंग आणि कम्युनिकेशनसाठी प्रसिद्ध आहे. विविध माध्यमांमधील जाहिराती, बिलो द लाईन अडव्हर्टाइझिंग, जनसंपर्क, 3 डी रेंडरिंग, पुरस्कार आणि मान्यता, डिजिटल आणि डायरेक्ट मार्केटिंग, विश्लेषण आणि मिस्टरी शॉपिंग अशा विविध सेवा झेकोकडून पुरवल्या जातात. विशिष्ट मुल्यांच्या आधारे या क्षेत्रातील मोठे ब्रँड्स विकसित करताना झेकोने विश्वासार्हतेचे मापदंड निर्माण केले आहेत. त्यामुळेच कोणाबरोबर व्यवहार होत आहेत, प्रॉपर्टीचे मालक कोण आहेत आणि कोणाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे याची प्रत्येकाला पूर्ण कल्पना येते.