image

कंपनीची माहिती

‘प्लेटॉर’ हा शब्द ‘प्ले’ आणि ‘लिबरॅटर’ या दोन शब्दांपासून बनला आहे. नावाप्रमाणेच ‘प्लेटॉर चाइल्डस्पेसेस’ मध्ये लहान मुलांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. त्याचे उद्देशाने भारतातील मोठ्या शहरांजवळ गृहप्रकल्प उभारण्यात येत आहेत.

प्लेटॉर चाइल्डस्पेसेसचा प्रत्येक प्रकल्प हा समाजाला समृद्ध करणारा आणि सामाजिक विकासासाठी सर्वोत्कृष्ट परिसर उपलब्ध करुन देणारा असेल यावर आमचा विश्वास आहे. परवडण्याजोग्या घरांची निर्मिती करतानाच, मुलांचे शिक्षण आणि त्यांच्या सुरक्षेला आमचे प्राधान्य आहे. त्याद्वारे आनंदी समाज आणि संतुलित पर्यावरण यासाठी आम्ही बांधील आहोत.

‘प्लेटॉर चाइल्डस्पेसेस’ मधील सगळी घरे ही शाळेपासून चालत जाण्याच्या अंतरावर आहेत. इथे मुलांच्या वाढीसाठी पोषक वातावरण आहे. बागा आणि स्पोर्ट झोन तर आहेतच. शिवाय सुरक्षित वातावरणाची हमी असल्यामुळे मुलांना मुक्त बागडण्याचा आनंद घेता येईल आणि त्यांच्या सर्वांगीण विकासालाही चालना मिळेल.

मुलांना राहण्यासाठी, खेळण्यासाठी आणि त्यांच्या वाढीसाठी प्लेटॉर ही सर्वोत्कृष्ट जागा असेल.