image

आमची फिलोसॉफी

मुलांच्या गरजांचा विचार करुन त्यांच्यासाठी सुरक्षित वातावरण आणि भरपूर मोकळी जागा उपलब्ध करणे हीच प्लेटॉर चाइल्डस्पेसेसची फिलोसॉफी आहे.

आपल्या आजूबाजूला काँक्रिटचे जंगल दिवसेंदिवस वाढत असताना मुलांना खेळण्या-बागडण्यासाठी जागा मिळणेही अवघड झाले आहे. मोकळ्या जागेत मनसोक्त खेळणे आणि सुरक्षित रस्त्यांवर आरामात सायकल चालवणे हा मुलांचा अधिकार आहे. आपल्या आजूबाजूच्या परिसराशी त्यांची ओळख व्हायला हवी आणि त्यांनी निसर्गाशी नातेही जपायला हवे. हे साध्य करण्यासाठी आमच्या सगळ्याच प्रकल्पात मुलांसाठी मोकळ्या, प्रशस्त आणि सुरक्षित जागेला प्राधान्य देण्यात आले आहे. खास मुलांसाठी म्हणून तयार करण्यात आलेल्या या जागेत अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. इथल्या प्ले झोनमध्ये वाहनांची संख्या मर्यादित राहील. तसेच इथे मुलं भरपूर खेळतील बागडतील आणि त्यामुळे दिवसभर उत्साही राहतील. केवळ काही मुलांना आनंदी करणे एवढ्यापुरतं आमचे ध्येय मर्यादीत नाही. आमच्या घरांच्या किमती आम्ही मुद्दाम 10 लाख रुपयांपासून सुरू केल्या आहेत. त्यामुळे अनेक जणांचे स्वत:च्या घराचं स्वप्न साकार होईल. शहरातील गर्दीत ज्यांचा जीव घुसमटतो आणि निसर्गाच्या कुशीत ज्यांना राहायचे आहे त्यांनादेखील एक समृद्ध अनुभव मिळेल.

मुलांना केंद्रस्थानी ठेऊन स्मार्ट किमतीत घरे बांधणे ; इतकंच नाही तर देशभरातील मुलांना समृद्ध बालपण देणे हेच आमचे तत्त्व आहे.