प्रकल्पावर दृष्टिक्षेप
गृहखरेदीसंदर्भात भारतीय ग्राहकांच्या असलेल्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करणारा प्लेटॉरचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राजगुरूनगर इथे 5 एकरांवर साकारत आहे. 1 आणि 2 बीएचकेच्या 450 फ्लॅट्सच्या या नावीन्यपूर्ण प्रकल्पाचे वास्तुरचनाकार आहेत हफीज कॉन्ट्रॅक्टर. घरात आणि घराबाहेर मिळणाऱ्या अनेक सोयी आणि सुविधा वैशिष्ट्यपूर्ण आहेत. मुलांच्या बेडरुममधील आवडत्या वॉलपेपरपासून ते ट्री हाऊस आणि जॉगिंग ट्रॅकपर्यंत प्रत्येक ठिकाणी याचा प्रत्यय येतो. अत्यंत माफक दरात इथे घरं उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. त्याचवेळी उत्तम दर्जा राखत असताना मुलांच्या आवडीनिवडीही जपण्यात आल्या आहेत.
मुंबई पुणे एक्स्प्रेस वे आणि पुणे नाशिक हायवे मार्गे इथे सहज पोहोचता येते. रस्ते तर आहेतच. पण रेल्वेमार्गही फार दूर नाही. मुख्य म्हणजे प्रस्तावित पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय वाहतूक थेट राजगुरुनगरच्या दारात पोहोचली आहे.
या परिसरात नोकरीच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत. कल्याणी खेड सिटी- सेझ, 4200 एकर क्षेत्रात पसरला असून त्यामुळे या परिसराचा आणखी विकास होणार आहे. टेक्सटाईल, इंजिनियरिंग, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटीचे स्वतंत्र पार्क इथे उभे राहणार आहेत. त्यामुळे उत्तम नोकरीच्या संधींसाठी तुम्हाला दूर जाण्याची गरजच नाही. शिवाय, मोटार उद्योगात आघाडीवर असलेला चाकण तळेगाव ग्रोथ कॉरिडॉर, तसंच बजाज, मर्सिडीज, महिंद्रा अँड महिंद्रा आणि जनरल मोटर्सचे उद्योगही प्रकल्पाच्या जागेपासून फक्त 10 किमी अंतरावर आहेत. मोठ्या प्रमाणावर उत्तम रोजगाराच्या संधी तसेच शाळा, कॉलेज, हॉस्पिटल्स, रेस्टॉरंट्स, मंदिर असं सगळंच राजगुरुनगरच्या रहिवाशांना सहजपणे उपलब्ध आहे.